आमच्या विषयी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून समाजप्रबोधनाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८९ पासून अविरतपणे करत आहे. भारतीय नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करत संघटनेचे काम चालत आहे. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार, धर्माची विधायक आणि कालसुसंगत चिकित्सा, परिवर्तनाच्या व्यापक चळवळीशी स्वतःला जोडून घेणे या चतुःसूत्रीनुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम चालते. संघटनेच्या स्थापनेपासून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध मार्गांनी, विविध माध्यमांतून प्रबोधनाचे काम करत आलेली आहे. 

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रबोधनाच्या कामात संघटनेचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाचे योगदान खूप मोठे आहे. १९९० पासून नियमितपणे प्रकाशित होत असलेल्या या नियतकालिकाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम जनमानसात पोचवण्यास मोलाची मदत केली आहे. या मासिकातून आजपर्यंत अनेक मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी देखील या मासिकात विपुल लेखन केले आहे. या मासिकातील त्यांचे लेखन म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जिवंत इतिहास आहे. त्याचबरोबर ते उच्च दर्जाचे विचारमंथन आहे. कार्यकर्त्यांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. त्यामुळे हा प्रेरणास्रोत जपणे आणि तो नव्या पिढीपर्यंत पोचवणे ही काळाची गरज आहे.

1 टिप्पणी:

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...